Thursday, September 8, 2011

आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत

आमचा देव दगडाचा नाही. आम्ही दगडात देव पाहणारी माणसं आहोत. दगडात देव असतोच, मुर्ती असतेच.दगडाचा फ़क्त नको असलेला भाग काढुन टाकायचा असतो.मुर्तीच्या भागाकडे फ़क्त लक्ष ठेवा. फ़ेकुन द्यायच्या भागाकडे नको. आणी मग ह्याच भावनेनं, निसर्गातल्या इतर गोष्टींकडे पहा. झाडं, नद्या, वारे, आकाश, जमीन आणी शेवटी माणुस. माणसातलाही नको असलेला भाग दूर करायला शिका. ह्याची सुरुवात स्व:तपासुन करा. स्व:तला नको असलेला भाग कोणता? तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा आणी आत्मविश्वास ह्याला तडा जातो तो आचार, तो विचार हा टाकायचा भाग..

1 comment:

  1. पत्री

    देशभक्तीपर कविता
    भारतमाता

    हे भारतमाते मधुरे!
    गाइन सतत तव गान।।

    त्याग, तपस्या, यज्ञ, भूमि तव जिकडे तिकडे जाण
    कर्मनीर किति धर्मवीर किति झाले तदगणगा न।। गाइन....।।

    दिव्य असे तव माते करिता इतिहासामृतपान
    तन्मय होतो मी गहिवरतो हरपून जाते भान।। गाइन....।।

    देउन देउन दीन जाहलिस तरिही देशी दान
    परजीवन सांभाळिशि संतत अर्पुन अपुली मान।। गाइन....।।

    सत्त्वाचा सत्याचा जगती तूचि राखिशी मान
    तुझ्या कथा ऐकाया उत्सुक भगवंताचे कान।। गाइन....।।

    एकमुखाने किति वर्णु मी आई तव महिमान
    थकले शेषहि, थकले ईशहि, अतुल तुला तुलना न।। गाइन....।।

    धूळीकण, फळ, फूल, खडा वा असो तरुचे पान
    तुझेच अनुपम दाखविती मज पवित्र ते लावण्य।। गाइन....।।

    मांगल्याची माधुर्याची पावित्र्याची खाण
    परमेशाच्या कृपाप्रसादे नुरेल तुजला वाण।। गाइन....।।

    समरसता पावणे तुझ्याशी मदानंद हा जाण
    यश:पान तव सदैव करितो करितो मी त्वद्धयान।। गाइन....।।

    बहुभाग्याने बहुपुण्याने झालो तव संतान
    तव सेवा मम हातुन होता हरपो माझा प्राण।। गाइन....।।

    ReplyDelete